pune anti corruption bureau | इंदापुर तालुक्यातील पळसदेवचा तलाठी अन् खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील पळसदेवचा तलाठी पुण्यात लाच घेण्यासाठी आल्यानंतर त्याला व खासगी व्यक्तीला पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने pune anti corruption bureau रंगेहात पकडले आहे. गुरूवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. राजेश उत्तम गायकवाड (वय 40) आणि संग्राम नथु भगत (वय 41) असे पकडलेल्या तलाठ्याचे व खासगी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून pune anti corruption bureau कोथरूड पोलीस ठाण्यात kothrud police station गुन्हा दाखल FIR करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड हे इंदापूर पळसदेव येथील तलाठी (Talathi) आहेत.
यादरम्यान यातील तक्रारदार हे वकील असून त्यांनी आशिलाच्या वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी अर्ज केला होता.
त्यावेळी लोकसेवक राजेश यांनी 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार याची पडताळणी केली.
त्यात लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज सापळा कारवाईत खासगी व्यक्तीमार्फत तडजोडीअंती 8 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

 

Wab Title :- pune anti corruption bureau | Talathi of Palasdev in Indapur taluka and private person in the net of anti-corruption

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत