पुणे : झोपेत असलेल्या इसमावर कोयत्याने वार, आरोपी अटकेत

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

झोपेत असलेल्या इसमाच्या डोक्‍यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रत्यत्न करण्यात आला. हा प्रकार शुक्रवार पेठ, सुभाषनगर येथे बुधवारी (दि.१९) सकाळी सहाच्या सुमारास घडला. खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अनुराग कमलेश भाटीया (वय -२३, कृष्ण कमल सोसायटी, सुस-पाषाण रस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राजेश अनिल वर्तक (वय ४६, रा. शुक्रवार पेठ, सुभाषनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B078M16N8P,B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’137a3af2-bcda-11e8-8bde-97588f4906cb’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी राजेश वर्तक हे त्यांच्या घरात झोपले होते. त्यावेळी भाटीया तेथे आला. त्याने राजेश यांच्या डोक्‍यावर, उजव्या खांद्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेत राजेश यांच्या चेहऱ्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादेवरुन पोलिसांनी आरोपी भाटिया याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड करत आहेत.

कॅम्पमध्ये तरुणावर पाचजणांचा जीवघेणा हल्ला

एकमेकांकडे बघण्याचा कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांनी एका तरुणावर पालघनने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाच वाजता कॅम्प येथील ठक्कर को-ऑपरेटीव्ह सोसायटी येथील एका मोबाईल दुकानासमोर घडली.

याबाबत परवेज पटवेकर (वय २७, रा. गुरूवार पेठ) याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लष्कर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B07BR2PH18,B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20d914c1-bcda-11e8-bef8-990eb37d4bbe’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन दिवसांपूर्वी एकामेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. बुधवारी पटवेकर हे त्यांचे मित्र फैजल अन्वर शेख याचेसह कॅम्पमध्ये मोहरम ताबूत बघण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाच जणांनी जर्कीन पकडून, त्यांच्याजवळ असणाऱ्या लोखंडी पालघनने पटवेकर याच्या डोक्‍यावर, हातावर आणि पायावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले तपास करत आहेत.

नागपूर : कळमेश्वर-सावनेर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भिषण अपघात, पाच ठार  

पोलीस उपायुक्तांच्या अंगठीवर चोरट्यांचा डल्ला