पुण्यात किरकोळ वादातून तिघा भावांकडून युवकावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून तिघा भावांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरात घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अल्ताफ रफिक शेख (वय २०) कमरुद्दीन रफिक शेख (वय २२) आणि वसीम रफिक शेख (वय २४, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत विशाल जाधव (वय २१, रा. मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास विशाल हे त्यांचा मित्र सतीश कसबे यांच्यासोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या अल्ताफने विशालला दुचाकी बाजूला घ्यायला सांगितले. विशालने अल्ताफला तुला जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे. तू तेथून जाउ शकतो असे सांगितले. त्याचा राग मनामध्ये ठेउन अल्ताफ घरी निघून गेला. काही वेळानंतर अल्ताफ त्याच्या दोन भावडांना घेउन त्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने विशाला शिवीगाळ करुन डोक्यात कोयत्यानेे मारुन जखमी केले. अधिक तपास सहायक निरीक्षक पी. ए. खटके करीत आहेत.