पुण्यात आर्थिक वादातून कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पैशांच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन कडाक्याच्या भांडणात होऊन एकावर कोयत्याने सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी अभिजीत मच्छिंद्र काळे (वय 35, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मयुर प्रकाश उर्फ पोपट बनकर (वय 27) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत काळे याचे ससाणेनगर परिसरात हॉटेल आहे. दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. दरम्यान, अभिजीत काळे याने फिर्यादींना उसणे पैसे दिले होते. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यादोघांमध्ये वाद झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. सोमवारी त्यांच्यात किरकोळ वाद झाल्यानंतर फिर्यादींनी आरोपीस शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी आरोपी फियादींच्या दुकानावर गेला होता.

यावेळी त्यांच्यात पुन्हा शाब्दीक वाद झाल्याने आरोपीने दुकानात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने सपासप वार जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपी बनकर याला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दिलीप गाडे हे करत आहेत.