Pune : रागाने पाहिल्यामुळं तिघांकडून तरूणाला बेदम मारहाण, तीक्ष्ण हत्यारानं वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दत्तवाडीत परिसरात तरुणाने रागाने पाहिल्यावरून तिघांनी त्याला बेदम मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी विकास माळी (वय 19, जनता वसाहत) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाच्या आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. दरम्यान फिर्यादी तरुण हा श्रध्दा मारुती मंडळ कॅनॉल जवळ थांबला असता त्या ठिकाणी तिघे आरोपी आले. त्यांनी तू माझ्याकडे लय रागाने पाहत होता का, लय शहाणा झाला का असे म्हणत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला लाथा-बुक्यांनी मारहाण करत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. अधिक तपास उपनिरीक्षक अभंग हे करत आहेत.