पुण्यात लष्कराच्या जवानाचे पत्नीवर चाकूने सपासप वार, गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात रजेवर आलेल्या लष्कर जवानांने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर जवनाने स्वतः गळ्यावर वारकरून घेत आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

मोहिनी रोहीत मोरे (वय 30) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर रोहीत मोरे (32) हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

रोहीत हे लष्करात असून, ते एका महिन्याच्या सुट्टीवर आले होते. रात्री रोहीत याने पत्नीवर चाकूने वार केले. तसेच तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतः गळ्यावर चाकूने वारकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. नेमके वाद का झाले याचा तपास करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान घरघुती वाद झाले असावे. त्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.