येरवड्यात तरुणावर कोयत्याने वार, चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  तुम्हाला पैसे देतो, दारु बाटली आणून दे म्हणल्यानंतर झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना येरवडा परिसरात घडली. पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आली आहे.

यश दीपक डाडर (वय २२), अजय दीपक डाडर (वय २४), क्रांती उपॅâ बॉबी डाडर (वय २०), अनिकेत प्रकाश डाडर (वय १९, सर्व रा. यशवंतनगर, येरवडा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नीलेश उर्फ पिण्या साळवे (वय १९, रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलेश आणि चार हल्लेखोर एकाच परिसरातील रहिवाशी आहेत. ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोन दिवसांपुर्वी यश, अजय, क्रांती, अनिकेत राजीव गंगा कॉम्प्लेक्स परिसरात बसले होते. त्यावेळी तेथे गेलेल्या नीलेशने मी तुम्हाला पैसे देतो, दारुची बाटली आणून दे असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे चौघांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर यश आणि इतरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी येरवडा पोलिस तपास करीत आहेत.