Pune News : सावधान ! कोरोना व्हायरस बदलतोय रुप? एकाच कुटुंबातील अनेकांना संसर्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या पुण्यात आहेत. पण त्यातच आता कोरोना व्हायरस आपलं रुप बदलत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण होत आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानुसार, आता पहिल्या लाटेच्या तुलनेत एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर डॉक्टरांचे म्हणणे आहे, की ‘या व्हायरसमधील हस्तांतरणाचे प्रमाण वाढले असून, होम आयसोलेशनचे प्रोटोकॉल योग्य पद्धतीने पाळले जात नाहीत. त्यामुळे असे प्रकार दिसत आहेत.’ त्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले, की वैद्यकीय विश्लेषणातून हे समोर आले की कोरोना व्हायरस आता रुपात बदल होत आहे. यापूर्वी होम आयसोलेशमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील दोन किंवा तीन जणांना कोरोनाचा संसर्ग होत असे. मात्र, आता एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील दोन किंवा तीन जणांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग होत असे. पण आता रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कुटुंबातील अनेकांन कोरोना संसर्ग होत आहे. मात्र, यातील चांगली बाब म्हणजे या सर्वांची लक्षणे कमी तीव्रतेची आहेत, असे जहांगीर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.