नेपाळी तरूणीचं 7 महिन्यांपासून लष्करी अधिकार्‍यांच्या क्वार्टरमध्ये वास्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   एक नेपाळी तरुणी (nepali girl) गेल्या सहा ते सहा महिन्यांपासून पुण्यातील सीएमईमध्ये (College of Military Engineering) राहत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसानी संबधित तरुणीला अटक केली आहे.

एलिसा (26) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सीएमईमध्ये 23 मार्च रोजी एलिसाने मॅकडोनाल्ड शॉप फुगेवाडी येथून भिंतीवरून उडी मारून लष्करी रहदारी असलेल्या सीएमईमध्ये अनधिकृतपणे प्रवेश( for-unauthrised-entry-in-cme ) केल्याच उघड झाले. नेपाळी तरुणी लष्करातील सरकारी अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये राहत असल्याचे पोलीस तक्रारीत सांगण्यात आले आहे. लष्कराच्या मालमत्तेस आणि लष्कराच्या अधिकारी, जवानांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासाठी तेथे राहात असल्याच्या संशयावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय आनंदराव काळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एलिसाला अटक केली आहे.

ही नेपाळी तरुणी दुबईवरून मलेशिया, नेपाळ आणि त्यानंतर मुंबईमध्ये आली असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले आहे. तसेच पुण्यामध्ये एका मित्राकडे राहत होती. त्यानंतर तिने दापोडी सीएमई जिथे लष्कर अधिकारी, कर्मचारी राहतात त्या ठिकाणी अनधिकृतपणे प्रवेश केली होती.