Pune Chandni Chowk Traffic Start | चांदणी चौकातील वाहतूक साडे अकरा तासांनी पूर्ववत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chandni Chowk Traffic Start | वाहतूककोंडीला अडथळा ठरणाऱ्या चांदणी चौकातील उड्डाणपूल शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पाडण्यात आला. तत्पुर्वी परिसरातील बंद करण्यात आलेली वाहतूक अखेर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू करण्यात आली. उड्डाणपूलाचा मलबा, माती, सिमेंट हटविल्यानंतर तब्बल साडेअकरा तासानंतर परिसरातील वाहतूक पूर्ववत झाली. (Pune Chandni Chowk Traffic Start)

 

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील जुना पूल शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट घडवून पाडण्यात आला. त्यानंतर आठ ते दहा जीसेबी आणि पोकलेनच्या मदतीने दीड तासांनी पुलाचा सांगाडा जमीनदोस्त करण्यात आला. त्यापाश्र्वभूमीवर शनिवारी रात्री अकरा वाजता बाह्यवळण मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उड्डाणपुल पाडण्यासाठी स्फोट घडविण्यात येणार असल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्यामुळे रात्री उशिरा कामावरून सुटणाऱ्या स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
त्याशिवाय भूगाव आणि परिसरात जाण्यासाठी मध्यरात्री दोनपर्यंत वाट पाहावी लागली.

 

Web Title :- Pune Chandni Chowk Traffic Start | Traffic at Chandni Chowk was restored after eleven and a half hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ind vs SA | गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेचा ‘तो’ रेकॉर्ड मोडण्याचे टीम इंडियासमोर आहे लक्ष्य

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क

Pune Crime | ढेकण्या वाघमारे टोळीविरूद्ध ‘मोक्का’चा बडगा; ‘मोक्का’ कारवाईच्या शतकापासून (100) पुणे पोलिस एक पाउल दूर

Shahajibapu Patil-On Ajit Pawar | शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता नसेल, पण लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार; शहाजी बापू पाटलांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगावरील उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर