पुणे : सोने खरेदीला आले आणि ९ अंगठ्या घेऊन पसार झाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्वे रस्त्यावरही प्रसिद्ध बाफना ज्वेलर्स या सराफी दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी ९ अंगठ्या घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

याप्रकरणी सुनिल जैन (वय. 42, रा. शिवणे वारजे) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बाफना ज्वेलर्स दुकानात मॅनेजर पदावर नोकरीस आहेत. नळ स्टॉपजवळ हे दुकान आहे. साडेबाराच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या. दरम्यान अंगठ्या पहात असताना दुकानातील कर्मचार्‍यांची नजर चुकवून तब्बल 5 लाख 41 हजार 791 रुपयांच्या नऊ सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने चोरी करून पोबारा केला.

जेव्हा कर्मचार्‍यांनी दुकानातील मालाची तपासणी केली तेव्हा अंगठ्या चोरीला गेल्याचे समोर आले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून दुकानातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.

Visit : Policenama.com