Pune Cheating Fraud Case | पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक, दोघांवर FIR

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची एक कोटी 30 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केली. ही प्रकार 1 डिसेंबर 2022 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पिंपळे सौदागर परिसरातील कोकणे चौकातील व्ही-टास्क अकॅडमी येथे घडला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cheating Fraud Case)

याबाबत दीपक अनंत आवटे (वय 35, रा. शितळादेवी नगर, महाळुंगे, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वभूषण वाल्मिक गायकवाड (वय 24), कुलभूषण वाल्मीक गायकवाड (वय 23, दोघे रा. डीलक्स टॉकीज समोर, पिंपरी) यांच्या विरोधात आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून स्टॅम्प पेपरवर वेळोवेळी समजुतीचा करारनामा करुन फिर्यादी यांच्या व्ही-टास्क अकॅडमीच्या एस्पायर एंटरप्रायजेसच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी आरोपींच्या बँक खात्यावर एक कोटी तीस लाख 30 लाख 28 हजार रुपये जमा केले. ते पैसे आरोपी पुढे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार होते. त्या बदल्यात व्याज म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना 41 लाख 65 हजार 370 रुपये पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांची परतफेड करण्यास टाळाटाळ करून त्यांची एक कोटी 30 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार