Pune : COEP जंबो कोव्हिड हॉस्पीटलसह ‘या’ 3 रुग्णालयात लवकरच पोस्ट कोव्हिड उपचार सुरू करणार : डॉ. संजीव वावरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनातून बरे झाल्यानंतर पुढील दीड ते दोन महिने रुग्णांना ह्दयरोग, मानसिक अस्वस्थता व तत्सम आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे. अशा रुग्णांवर उपचारासाठी सीओईपी जंबो कोव्हिड हॉस्पीटल, बाणेर येथील कोव्हिड स्पेशल हॉस्पीटल आणि डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये पोस्ट कोव्हिड उपचार सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सह आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

डॉ. वावरे यांनी सांगितले, की तीव्र लक्षणे असतानाही कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुढील दीड ते दोन महिने अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोनामुळे रक्तात तयार होणार्‍या गाठींमुळे ह्दयरोगाचा झटका येेणे, स्ट्रोक, मानसिक अस्वस्थता अशा आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सीओईपी जंबो कोव्हिड हॉस्पीटल, बाणेर कोव्हिड स्पेशल हॉस्पीटल आणि डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय येथे पोस्ट कोव्हिड बाह्य रुग्ण कक्ष उभारण्यात येणार आहे. याठिकाणी केवळ समुपदेशनच नव्हे तर रुग्णांची संपुर्ण आरोग्य तपासणी करून औषधोउपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या यासाठी वैद्यकीय अधिकारी व स्टाफला प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच ही यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येईल, असे डॉ. वावरे यांनी नमूद केले.

You might also like