Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत दिवसेंदिवस वाढ पहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे. तर ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची देखील संख्या वाढली आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona) 524 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 79 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

आज पुणे शहरात 6 हजार 786 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 524 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत करण्यात आलेल्या एकूण 38 लाख 79 हजार 487 प्रयोगशाळा तपासणीत 5 लाख 11 हजार 141 जणांना कोरोनाची बाधा (Pune Corona) झाली आहे. यापैकी 4 लाख 99 हजार 509 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आज शहरात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत शहरात 9 हजार 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 2 हजार 514 अॅक्टिव्ह रुग्ण
(Active patient) असून यामध्ये 99 रुग्ण गंभीर आहेत. तर 72 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

 

 

Web Title :- Pune Corona | Worrying ! The number of active patients in the city is over two housands five hundred, 524 new patients in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

Whatsapp Account Ban | खबरदार ! ‘ही’ चूक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट होईल बॅन, नोव्हेंबरमध्ये 17.5 लाख अकाउंट झालेत BAN, जाणून घ्या सविस्तर

Credit Card | क्रेडिट कार्डचा वापर करताना लक्ष ठेवा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

APY | ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नी दोघांना मिळेल रक्कम, दर महिना कमावू शकता 10,000 रुपये; जाणून घ्या कसे?

OBC Reservation | केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला, विजय वडेट्टीवारांचा घणाखाती आरोप; म्हणाले – ‘…तर मंत्रिपदाचा त्याग करणार’

PM KISAN चा 10 वा हप्ता ! 11 कोटी शेतकर्‍यांना 1.8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर, पहा लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही

7th Pay Commission | जर आजच केले ‘हे’ काम तर ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात होईल वाढ, जाणून घ्या कशी?