Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1978 नवे पॉझिटिव्ह तर 45 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1978 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनामुळं पुणे शहरातील 45 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 18 जणांचा बळी आज पुणे शहरात गेला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 2793 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1587 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 19 हजार 657 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे 99 हजार 76 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 17 हजार 788 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 910 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 440 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.