Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 1142 जण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे कोरोनातून बर्‍या होणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात 1142 जण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 1177 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरात कोरोनामुळं 27 जणांचा मृत्यू झत्तला आहे.

पुणे शहरात पण पुण्या बाहेरील 15 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 1683 झाली आहे. सध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 71503 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 55100 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरात 14720 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 750 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 467 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, घराबाहेर पडताना नागरिकांनी सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करावं तसेच मास्क परिधान करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.