Coronavirus : पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 22 बळी, जाणून घ्या ‘पॉझिटिव्ह’ आणि ‘डिस्चार्ज’ झालेल्या रूग्णांची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. राज्यात मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनामुळं चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 523 रूग्ण आढळून आले असून कोरोनामुळं तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात कोरोनातून बर्‍या झालेल्या 328 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरातील एकुण कोरोनोबाधितांची संख्या आता 16125 वर जावुन पोहचली आहे. दरम्यान, त्यापैकी तबब्ल 9447 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात एकुण 6065 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रूग्णांपैकी 324 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार झाले आहेत. क्रिटिकल रूग्णांपैकी 54 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

आज दिवसभरात 328 रूग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 9447 वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसमुळं आतापर्यंत तब्बल 613 जणांचा पुणे शहरात मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. आज आढळून आलेल्या 523 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 16 ससून, 294 नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील 213 रूग्णांचा समावेश आहे.