Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 16 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात कोरोनाचे 1160 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुळं पुणे शहरात आतापर्यंत 1182 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात सद्यस्थितीला एकुण 49217 कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत एकुण 29489 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 18546 सक्रिय रूग्ण आहेत. आज आढळून आलेल्या नवीन रूग्णांपैकी ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे. सध्या सक्रिय असलेल्या 18546 रूग्णांपैकी 744 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 97 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. आज दिवसभरात तब्बल 896 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.