Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेत 1.20 कोटी रूपये किंमतीचे 3 किलो सोन्याचे दागिने भरदिवसा लांबविले, लहान मुलासह 2 महिलांचा प्रताप, जाणून घ्या प्रकरण (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील रविवार पेठेतील (Raviwar Peth) ज्वेलर्सच्या दुकानात मुंबईहून (Mumbai) दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे सुमारे 3 किलो सोन्याचे दागने लहान मुलासह दोन महिलांनी लांबविले आहेत. ही घटना आज (शनिवार) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानाजवळ घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रकरणाचा युध्दपातळीवर तपास (Pune Crime) करीत आहेत.

 

 

जिग्नेश नरेश बोराणा (33, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात (faraskhana police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची खातरजमा करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोराणा आणि मुकेश चौधरी हे मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आले होते. ते रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या (jewellery shops) दुकानात गेले. दरम्यान, त्यांच्याकडे एक दागिन्यांची पेटी होती. त्यामध्ये सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते. लहान मुलगा आणि दोन महिलांनी ती सोन्याचे दागिने असलेली पेटी पळवली. बोराणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. दरम्यान, फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हयाचा तपास फरासखाना पोलिस करीत आहेत. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याची सांगण्यात आले आहे.
गणेश विसर्जनचा बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला आहे.
त्यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. तपासाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सुचना दिल्या आहेत.

Web Titel :- Pune Crime | 1.2 crore 3 kg gold jewelery worth Rs 1.20 crore in Pune’s Raviwar Peth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BSP MP Satish Chandra Mishra | सतीश चंद्र मिश्रा यांचा दावा – यूपीत प्रत्येक 10 पैकी 8 एन्काऊंटर ब्राह्मणांचे होत आहेत

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 80 रुग्णांचा मृत्यू, 3,841 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Digital Garage King | पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण बनला ‘डिजिटल किंग’