Pune Crime | नोकरी देण्याच्या आमिषाने नागरिकांना 11 लाखांचा गंडा, एकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बँकेसह रेल्वे, अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये (ammunition factory) मुलांना नोकरी (Job) लावण्याच्या आमिषाने एकाने नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. ही घटना पुण्यामध्ये (Pune Crime) फेब्रुवारी 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) घडला आहे. याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीटर मॅन्यअरल संसार (रा. सत्यम श्रीनीटी, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नानासाहेब जमनराव भारुड (वय-60 रा. साईनगर, कोंढवा बु.) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासह साक्षीदाराच्या मुलांना बँकेसह रेल्वेमध्ये लिपिक
पदावर नोकरी लावण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. त्यानुसार त्याने काही जणांकडून
वेळोवेळी रक्कम स्वीकरली. तब्बल 11 लाख 16 हजारांची रक्कम स्विकारूनही नोकरीला न लावता
फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra Government | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना 5 ते 6 % व्याजदराने कर्ज पुरवठा; जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | 11 lakh bribe to citizens in the lure of giving jobs, FIR on one

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update