Pune Crime | MBBS ला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 जणांची 2.53 कोटींची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नाशिक (Nashik) येथील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) मॅनेजमेंट कोट्यातून (Management Quota) MBBS ला प्रवेश (Admission) देण्याच्या बहाण्याने 13 जणांची फसवणूक (Cheating) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 जणांकडून तब्बल 2 कोटी 53 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) विमाननगर परिसरात (Viman Nagar Area) घडला असून याबाबत एजंटवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र कुशवाह (Rajendra Kushwaha), चंद्रशेखर देशमुख (Chandrasekhar Deshmukh), पारस शर्मा (Paras Sharma) व त्यांच्या इतर साथीदारावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अहमदनगर (Ahmednagar) येथील नेवासा फाटा (Nevasa Fata) येथे राहणाऱ्या एका पालकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार विमाननगर येथील प्लॅटिनम बिल्डिंग (Platinum Building) आणि नाशिक येथील गंगापूर (Gangapur) येथे घडला. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये (Vasantrao Pawar Medical College) मॅनेजमेंट कोठ्यातून एमबीबीएसला प्रवेश देतो असे एजंटने सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करुन आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 30 लाख 72 हजार रुपये घेतले. याशिवाय आणखी 12 जणांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घतली. पैसे घेऊन मुलाला प्रवेश मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी पुणे पोलिसांकडे (Pune Police) धाव घेत आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. आरोपींनी 13 जणांना 2 कोटी 53 लाखांचा गंडा घातला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे (PSI Dombale) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 2.53 crore fraud of 13 persons under the pretext of admitting nashik mbbs college

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर