Pune Crime | वाघोली-चंदननगर परिसरात भर रस्त्यात 24 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग करुन अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैत्रिणीबरोबर रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरुन येऊन दोघा टोळभैरवांनी भर रस्त्यात तिचा हात पकडून मारहाण करीत अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी (Threat Of Acid Attack) देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वाघोली (Wagholi) येथील एका 24 वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 216/22) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदिल रईस मलिक (वय 18, रा. बीडी कामगार वसाहत, चंदननगर) आणि रोहित शरद माने (वय 27, रा. शास्त्रीनगर, येरवडा – Yerwada) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून रोहित याला अटक केली आहे. ही घटना खराडी येथील एसएनएस बी टु बी कंपनीसमोर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी हे चहा पिण्यासाठी जात असताना दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी फिर्यादी यांना कट मारुन त्यांचा रस्ता अडवला. आदिल याने त्यांचा हात पकडून आपल्याजवळ ओढून त्यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग (Molestation Case) केला. त्यांना हाताने मारहाण करुन जोरात ढकलून दिले. रोहित याने मी तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकेन अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरुन त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी रोहित याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 24 year old girl molested and threatened with acid in Wagholi Chandannagar area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा