Pune Crime | धक्कादायक ! दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला गॅस सिलेंडर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती-पत्नीमध्ये भांडण (Dispute) होणं हे काही नवीन नाही. परंतु पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये एका नराधम पतीने पत्नी दारु पिण्यास (Drink Alcohol) विरोध करते. तसेच दारु पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरुन घरगुती वापराचा गॅस सिलेंडर (Gas Cylinder) डोक्यात तीनवेळा मारुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. ही धक्कादायक (Pune Crime)  घटना गुरुवारी (दि.31) सायंकाळी साडेपाच वाजता भोसरी (Bhosari) येथील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

मिना नितीन वकटे Mina Nitin Wakte (वय-35) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नितीन आयलाजी वकटे Nitin Aylaji Wakte (वय-35) याला अटक केली आहे. पतीने केलेल्या खुनी हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीना या घरी असताना आरोपी पतीला त्यांनी दारु पिण्यास विरोध केला. तसेच दारु पिण्यासाठी पतीला पैसेही दिले नाहीत. या कारणावरुन आरोपीने पत्नीच्या डोक्यात तीनवेळा गॅस सिलेंडर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A gas cylinder hit his wife in the head for not paying for alcohol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेसाठी E-KYC केली नसेल तर लाभ घेता येणार नाही; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

 

Kirit Somaiya | ‘या’ मंत्र्यावर कारवाई केली तर आदित्य ठाकरे, अजित पवारांवर कारवाई करावी लागणार; सोमय्यांचा खळबळजक दावा!

 

Pune NCP | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात ‘राष्ट्रीय फेकू दिवस’ साजरा