Pune Crime | जात पंचायतीची तक्रार करणार्‍या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जात पंचायतीने बहिष्कृत केल्यानंतर त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करणे महागात पडले असून, महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी (Pune Crime) देण्यात आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ (bharti vidyapeeth) परिसरात ही घटना (Pune Crime) घडली आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश प्रेम कुंभार (वय 40), निखिल सुनील कुंभार (वय 29), प्रेम कुंभार (वय 60) आणि तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेची आई धनकवडीत राहते. त्या 17 जुलै रोजी
आईकडे आल्या होत्या. दरम्यान, फिर्यादी महिलेला त्यांच्या समाजाच्या जात पंचायतीने समाजातून
बहिष्कृत केले होते. त्या विरोधात त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल
आहे. तक्रारीत महिलेने संबंधित आरोपींचे नाव टाकले होते. “त्या तक्रारीत आमचे नाव का टाकले,”
असे म्हणत आरोपींनी महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी महिलेचा पती,
बहिण आणि आईला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. बहिष्कृत केल्याच्या गुन्हा सासवड पोलिस
ठाण्यात वर्ग केला आहे. त्याचा तपास सासवड पोलीस (Saswad Police) करत असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तानाजी भोगम हे करत आहेत.

हे देखील वाचा

Indian Navy Recruitment | भारतीय नौदलात 350 हून अधिक नाविक पदांची भरती, जाणून घ्या सविस्तर

Porn films case | उद्योजक राज कुंद्राच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे, या प्रकारचे झाली होती सुरूवात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | A woman complaining to a caste panchayat was beaten by hands and legs, an incident took place in Bharati University premises

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update