Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील प्रसिध्द ज्वेलर्सच्या दुकानातून 2.70 लाख रुपयांचे सोन्याचे गंठण महिलेने केले लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रविवार पेठेत सराफ दुकानात आलेल्या सेल्समनकडील १ कोटी रुपयांचे दागिने असलेला बॉक्स चोरुन नेण्याच्या घटनेनंतर आता रविवार पेठेतील एका प्रसिध्द ज्वेलर्सच्या दुकानातून एका बुरखाधारी महिलेने तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण सेल्समनची नजर चुकवून पळवून नेल्याचे समोर (Pune Crime) आले आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार पेठेतील एका प्रसिध्द ज्वेलर्सच्या दुकानामध्ये १० नोव्हेबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी महिला दागिने खरेदी करण्यासाठी आली होती. यावेळी तिने सेल्समनला वेगवेगळे सोन्याचे गंठण दाखविण्यास सांगितले.
त्यावेळी तिने सेल्समनची नजर चुकवून ट्रेमधील ५९.१६० ग्रॅम वजनाचे २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरुन नेले.
त्यानंतर रात्री दागिन्याचा हिशोब लावताना त्यात गडबड असल्याचे लक्षात आले.
त्यावेळी सीसीटीव्ही तपासण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर (Pune Crime) आला. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Titel : Pune Crime | A woman made a gold knot worth Rs 2.70 lakh from a famous jewelery shop in Raviwar Peth, Pune

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा