Pune Crime | मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील हत्याकांडातील आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रातर्विधीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर चाकून जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला होता. या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता तर एक मुलगी गंभीर जखमी झाली होती. हा प्रकार 21 मे 2016 रोजी सकाळी 10.30 सुमारास पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) सुदुंबरे (Sudumbare) गावच्या हद्दीत घडला होता. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल (Additional District and Sessions Judge G.P. Agarwal) यांनी बुधवारी (दि.12) निर्दोष मुक्तता (Innocent) केली.

 

कुम्या उर्फ कुमार दत्तू तळपे Mahendra Dattu Talpe (वय-26) असे निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली होती. आरोपीकडे स्वत:चे वकील नसल्याने सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्या आदेशानुसार ॲड. निलेश दलाल (Adv. Nilesh Dalal) आणि ॲड. सागर डोईफोडे (Adv. Sagar Doiphode) यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आरोपीतर्फे कामकाज पाहिले. (Pune Crime)

 

वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद
फिर्यादी यांच्यातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, फिर्यादी यांना आरोप सिद्ध करता आला नाही. फिर्यादी व फिर्यादीची मुलगी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून देखील तक्रार नोंदवताना त्याचे नाव घेतले नाही. या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव (Political Pressure) येत असल्याने व खरा गुन्हेगार मिळून न आल्याने पोलिसांनी सदर आरोपीस या गुन्ह्यमध्ये गुंतवून बळीचा बकरा बनवले. तसेच फिर्यीदीचे आरोपीविरुद्धचे म्हणणे संशयास्पद असल्याचे मुद्दे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले. आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. (Pune Crime)

खरा आरोपी अद्याप मोकाट ?
हा खटला साडेपाच वर्षे न्यायालयात चालला. या काळात तुरुंगात असलेल्या आरोपीच्या आयुष्याची नुकसान भरपाई प्रशासनाकडून मिळणार का? आणि हा आरोपी निर्दोष असेल तर खरा आरोपी अद्यापही मोकाट आहे, त्याचे काय? हे प्रश्न तसेच कच्चे कैदी व त्यांच्या जामिनाचा (Bail) प्रश्न या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

काय आहे प्रकरण ?
पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे गावच्या हद्दीमध्ये 21 मे रोजी सकाळी 10.30 च्या सुमारस फिर्यादी यांची मुलगी (वय-14) आणि भाची (वय-7) प्रातर्विधीसाठी घराबाहेर पडल्या. त्यानंतर फिर्यादी यांची मुलगी आणि भाची गंभीर जखमी केलेल्या अवस्थेत आढळून आल्या. दोघींच्या मानेवर धारदार चाकूने वार करण्यात आले होते. दोघींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, भाचीला मृत घोषीत करण्यात आले. हल्ल्यातून बचावलेल्या फिर्यादीच्या मुलीने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचे चित्र रेखाटून आरोपीला अटक केली.

 

Web Title :- Pune Crime | acquitted accused in murder case at Sudumbare in Maval of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा