Pune Crime | हॉटेलमध्ये घुसून मारहाण करुन चोरी करणार्‍या दोघांना अटक; खराडी-चंदननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पाण्याची बाटली, सिगारेट उधार देण्यास नकार दिल्याने हॉटेलमध्ये शिरुन मारहाण करुन मोबाईल व रोकड चोरुन नेणार्‍या दोघांना चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) अटक केली आहे. (Pune Crime)

 

प्रशांत मधुकर जगताप Prashant Madhukar Jagtap (वय २६) आणि अन्वर मोईद्दीन शेख Anwar Moiddin Shaikh (वय ३५, दोघे रा. थिटेनगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी मनिष प्रदीप सिंग (वय २८, रा. ग्रीन क्रीस्ट सोसायटी, भेकराईनगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग यांचे खराडी गावातील (Kharadi Gaon) रोडवर टेस्टी पॉईट नावाचे चायनीज हॉटेल आहे. शुक्रवारी दुपारी ते हॉटेलमध्ये असताना प्रशांत जगताप, अन्वर शेख हे त्यांच्या दोन साथीदारांसह आले. त्यांनी पाण्याच्या बाटल्या व सिगारेट उधार मागितल्या. फिर्यादी यांनी उधार देण्यास नकार दिला. तेव्हा फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली (Pune Crime). बॅटने व खुर्चीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांचा १० हजार रुपयांचा मोबाईल व ७ हजार ९०० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Arrest of two burglars for breaking into a hotel Incidents in Kharadi Chandannagar area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा