Pune Crime | भांडण सोडविणे पडले महागात; गुंडांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ओळखीच्या लोकांमध्ये सुरु असलेली भांडणे सोडविणे एका गृहस्थाला चांगलेच महाग पडले आहे. भांडणे सोडविली याचा राग मनात धरुन गुंडाच्या (Pune Criminals) टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. (Pune Crime)

याप्रकरणी जफर अब्दुल कयुम हकीम Zafar Abdul Qayyum Hakeem (वय ५०, रा. भीमपुरा गल्ली, कॅम्प Camp, Pune) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद ( गु. रजि. नं. ७६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हैदरअली रफिक शेख Haider Ali Rafiq Sheikh (वय २९, रा. नाना पेठ – Nana Peth, Pune) आणि उमेर जावेद शेख Umer Javed Sheikh (रा. भवानी पेठ – Bhavani Peth, Pune) यांना अटक (Arrest) केली आहे. त्यांचा साथीदार उमरअली शाकीर शेख (Umar Ali Shakir Sheikh) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरअली शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. फिर्यादी यांच्या ओळखीचे इशराक ऊर्फ इना व फुरकान यांच्याशी उमरअली व उमेर यांच्याबरोबर भांडणे सुरु होती. ही भांडणे फिर्यादी यांनी सोडविली. याचा राग मनात धरुन फिर्यादी हे ए डी कॅम्प चौकाजवळ शनिवारी रात्री पावणेदहा वाजता इना व फुरकान यांच्याशी बोलत थांबले होते. यावेळी शेख व त्याचे साथीदार आले. त्यांनी “इस जफरको तो अभी हम जानसेही मार डालेंगे, कोई बिचमे आयेगा नाही,” असे बोलून हैदरअली याने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. उमरअली हा त्यांच्या डोक्यात वार करीत असताना त्यांनी डावा हात मध्ये घातल्याने हाताला गंभीर दुखापत झाली. उमेर याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारहाण करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक हाळे (Sub-Inspector of Police Hale) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Attempt To Kill Incident In Samarth Police Station Limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी