Pune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत; व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एक महिन्याचे व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन एकावर वार करुन खून करुन फरार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) येथून जेरबंद केले. (Pune Crime)

प्रकाश शिंदे आणि किसन उफाडे अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे.

शरद शिवाजी आवारे (वय ४३, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार २८ नोव्हेबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील कात्रज ते नवले ब्रीजकडे (katraj to navale bridge) जाणार्‍या सर्व्हिस रोडवर चक्रधर एंटरप्रायजेससमोर घडला होता. या प्रकरणी त्याचा मित्र प्रशांत महादेव कदम (वय ३७, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. शरद आवारे याने प्रकाश शिंदे याच्याकडून कर्जाऊ पैसे घेतले होते. त्याचे तो नियमित व्याज देत होता. मात्र, नोव्हेबर महिन्याचे व्याज त्याने दिले नव्हते. त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला चंद्रसखा वेअर हाऊसजवळ  बोलावले होते. (Pune Crime)

त्याप्रमाणे शरद आवारे हा गेला असताना पैसे देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा प्रकाश शिंदे व किसन उफाडे यांनी त्याच्यावर वार करुन त्याचा खून (Pune Crime) केला होता.
त्यानंतर ते पळून गेले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharti Vidyapeeth Police Station) तपास पथक या दोघांचा शोध घेत होते.
दोघेही बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथक तातडीने माजलगावला गेले व त्यांनी दोघांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (senior police inspector jagannath kalaskar) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title :- Pune Crime | bharati vidyapeeth police station arrest two in ambegaon murder case from majalgaon of beed district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती

ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती

Pune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या ! प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड, विश्रामबाग, हडपसर आणि लष्कर विभागात नियुक्त्या