Pune Crime | रेशनिंग धान्याचा काळाबाजार ! प्रेमचंद जैन, प्रकाश सोलंकी, प्रमोद सोलंकी यांच्यावर FIR , 17 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार (Black Marketing Of Grains) करणाऱ्या टोळीचा (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell, Pune) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. संमवाडी येथे करण्यात आलेल्या या कारवाईत 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई (Pune Crime) रविवारी (दि.27) करण्यात आली.
टेम्पो चालक संतोषकुमार जयहिंद मोरे (रा. दिघी), पद्मावती फाऊंडेशन खडकी (Padmavati Foundation Khadki) चे मालक प्रेमचंद जैन (Premchand Jain), संतोषी रुपचंद सोलंकी (Santoshi Rupchand Solanki), प्रकाश रुपचंद सोलंकी (Prakash Rupchand Solanki), प्रमोद रुपचंद सोलंकी Pramod Rupchand Solanki (रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) अत्याआवश्यक वस्तु कायद्यानुसार (Essential Commodities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या टेम्पो (एमएच 14 वाय 2320) मधील सरकारी रेशनिंगचा तांदुळ (Rice) संगमवाडी येथे एका पत्रा शेडच्या गोडाऊन मध्ये खाली करुन तो पॉलिथीनच्या बॅगमध्ये भरुन तो छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्रीसाठी (Illegal Sale) साठवण्यात आला आहे. तसेच हा तांदूळ टेम्पोतून संध्याकाळी संमवाडी येथील गोदामात घेऊन जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संगमवाडी येथील गोडाऊनवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी रेशनिंगच्या तांदळाच्या पोत्यांनी भरलेला टेम्पो आढळून आला. पोलिसांनी टेम्पो चालक संतोषकुमार मोरे याच्याकडे चौकशी केली असता रेशनिंगचा तांदूळ पद्मावती फाऊंडेशनचे मालक प्रेमचंद जैन यांच्या सांगण्यावरुन संतोषी सोलंकी, प्रकाश सोलंकी, प्रमोद सोलंकी यांच्या संमवाडी येथील गोडाऊनमध्ये घेऊन आल्याचे सांगितले.
पोलिसांनी टेम्पो मधील अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला 152 क्विंटल तांदुळ जप्त केला. तसेच गोडाऊनची तपासणी केली असता त्यामध्ये काळ्या बाजारासाठी (Black Market) साठवून ठेवलेला 160 क्विंटल तांदुळ आणि 57.5 क्विंटल गहु व इतर मुद्देमाल असा एकूण 17 लाख 41 हजार 364 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील (API Abhijit Patil),
पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav),
पोलीस अंमलदार प्रमोद सोनावणे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, किरण ठवरे,
दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे, राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime | Black market of rationing grain! FIR filed against Premchand Jain, Prakash Solanki, Pramod Solanki, 17 lakhs seized
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Multibagger Stock | TATA Group च्या 3 रुपयांच्या शेअरचा जबरदस्त रिटर्न, एक लाखाचे केले 169 कोटी
Beed Accident | दुर्देवी ! महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 9 वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू