Pune Crime | गाडीच्या व्यवहारातून तरुणावर ब्लेडने वार, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गाडीच्या व्यवहाराती उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ करुन एकावर ब्लेडने मानेवर वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कासेवाडी येथील चमनशॉ दर्गा जवळ शुक्रवारी (दि.27) दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) आरोपी विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.

रफिक रशिद खाटीक (वय-30 रा. चमनशॉ दर्ग्याजवळ, कासेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रफिकच्या तक्रारीवरुन सादिक युसूफ ताडे (वय-55 रा. 10 नं. कॉलनी, कासेवाडी पार्कींग) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफिक आणि आरोपी सादिक यांच्यामध्ये गाडीचा व्यवहार झाला होता. या व्यवहारातील 3 हजार रुपयांची रक्कम येणे बाकी होती. फिर्यादीने वारंवार पैशांची मागणी केली. मात्र, आरोपीने वारंवार पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. यातूनच दोघांमध्ये वाद झाले. यातून आरोपी सादिक याने रफिकच्या मानेवर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Corporation Amenity Space | पुण्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत राष्ट्रवादीने एकमताने घेतला ‘हा’ निर्णय

‘या’ योजनेत तुम्हाला मिळतील 6 हजार रुपये, 1 सप्टेंबरपासून ‘इथं’ करा अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Aadhaar Card Updation | आधार कार्ड अपडेशन आणि ‘PAN-आधार’ लिंकिंगवर समोर आली महत्वाची माहिती, जाणून घ्या पूर्ण डिटेल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Blade stabs youth in car deal, arrests one

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update