पोलिस अधिकारी असल्याचे सांगत लुटणारा सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीत जेष्ठ नागरिकाला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत ३८ हजारांची सोन्याची अंगठी घेऊन पोबारा करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने अटक केली. त्याला
श्रीरामपूर येथून पकडले आहे. त्याच्यावर पुणे, पुणे ग्रामीण, ठाणे, नवघर, भिंवडी, सातारा, सांगली, नगर पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत.

आयात अली बाबूलाल अली इराणी (रा. इराणी वस्ती, श्रीरामपूर, नगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीत एका जेष्ठ नागरिकाला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन त्याने लुटले होते. गुन्हा सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याचे फुटेज पुणे पोलीसांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आले होते. त्यानुसार संबंधित गुन्ह्यातील आरोपी आयात इराणी असल्याचे कर्मचारी रमेश राठोड यांना लक्षात आले. इराणी श्रीरामपूरमध्ये इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी श्रीरामपूरमध्ये जाऊन सापळा रचून इराणीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार अकबर पठाणच्या मदतीने सांगलीमध्ये जेष्ठाला लुटल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, राजू मचे, रमेश राठोड, सागर घोरपडे, सुरेंद्र साबळे, अतुल मेंगे, शीतल शिंदे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/