Pune Crime Branch | दारु पिण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | दारु पिण्यासाठी घरफोडी करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे. दिलीप कृष्णराव नाईक (वय-47 रा. विहार कॉम्प्लेक्स, म्हसोबा वस्ती, मांजरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Pune Crime Branch)

मांजरी येथील घावटे वस्ती येथे 18 फेब्रुवारी रोजी दिवस फिर्यादीच्या घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरुन नेला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना युनिट पाचच्या पथकाने मांजरी येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार 500 रुपयांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दारु पिण्याकरीता पैसे पाहिजे होते म्हणून लॅपटॉप व मोबाईल चोरी करुन त्याची विक्री करण्यासाठी आल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार (IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane), पोलीस अंमलदार अमित कांबळे, दया शेगर, पल्लवी मोरे, स्वाती गावडे, पांडुरंग कांबळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

Maharashtra IAS Transfers | राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या ! कविता व्दिवेदी यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी नियुक्ती तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस यांची नियुक्ती

Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR