Pune Crime | मोबाईलचा गैरवापर करुन दुकानदाराने घातला व्यावसायिकाला 12 लाखांना गंडा; उत्तमनगर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेजारच्या दुकानदाराने मोबाईलचा गैरवापर करुन व्यावसायिकाच्या बँक खात्यातील १२ लाख रुपये स्वत:च्या व त्याच्या परिचिताच्या खात्यावर वर्ग करुन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी इब्राहीम निबर खान (वय २७, रा. न्यू कोपरे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय विश्वनाथ भगत (वय २७, रा. देशमुख वाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १० जून २०२२ पासून आतापर्यत घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इब्राहीम खान यांचा स्क्रपचा व्यवसाय आहे. त्यांच्या एका ग्राहकाने त्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा केले होते. ती रक्कम जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी गेले असताना त्यांच्या खात्यातून १२ लाख ९ हजार ४५३ रुपये काढले गेल्याचे आढळून आले. त्यांनी बँक स्टेटमेंट पाहिल्यावर हा प्रकार विजय भगत याने केल्याचे निष्पन्न झाले. (Fraud Case)

 

विजय भगत हा त्यांच्या तोंडओळखीचा मित्र आहे. त्याचे नर्सरीचे दुकान फिर्यादीच्या दुकानाचे शेजारी आहे.
फिर्यादीचे दुकानाचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या दुकानात विद्युत पुरवठा नसल्याने ते आपला मोबाईल त्याचे नर्सरीत चार्जिगला लावत असे.
त्यांनी मोबाईल चर्जिंगला लावला असताना त्याचा गैरवापर करुन त्यांच्या खात्यातील १२ लाख ९ हजार ४५३ रुपये
वेळोवेळी स्वत:चे व त्याच्या परिचिताच्या खात्यावर वर्ग केले. पोलीस निरीक्षक बोत्रे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | By misusing mobile phone, the shopkeeper cheated the businessman of 12 lakhs; FIR in Uttamnagar Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Narottam Mishra | भाजप मंत्र्याचे धक्कादायक विधान; म्हणाले; ‘शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…’ (व्हिडीओ)

 

Pune Crime | ट्रॅफिक जाममुळे कारचालकाची PMPML बसचालकाला मारहाण; शिवीगाळ करणार्‍या कटके कुटुंबियांवर गुन्हा दाखल

 

Governor Appointed MLA | उध्दव ठाकरेंना धक्का ! राज्यपाल कोश्यारींकडून ‘महाविकास’च्या 12 आमदारांची यादी अखेर रद्द