Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बुवाबाजी करून पती, सासू, सासऱ्याने सुनेला पाजलं कोंबडीचं रक्त; त्यानंतर केला ‘हा’ भयंकर प्रकार

पुणे / पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | बुवाबाजी करून पती, सासू आणि सास-याने चक्क विवाहितेला कोंबडीचे रक्त पाजले असल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. इतकंच नाही तर पती लैंगिक असक्षम असताना त्याचा विवाह लावू दिला. त्यानंतर सास-याने विवाहितेशी घरोबा करण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार भोसरी (Bhosari) या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणावरुन पती, सासू आणि सास-याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी पीडित विवाहितेने रविवारी (19 सप्टेंबर) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे.
दरम्यान ही घटना 30 डिसेंबर 2018 ते 19 जून 2021 या कालावधीत घडली आहे.
आरोपींनी आपसात संगनमत करून रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी तसेच घरखर्चासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली.
विवाहितेवर बुवाबाजी करून तिला कोंबडीचे रक्त (Pune Crime) पाजले.
तसेच, आरोपी सासऱ्याने विवाहितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग (molestation case) केला. तर, पतीकडे इंजिनिअरिंगची डिग्री असल्याचे विवाहाच्या वेळी खोटे सांगितले.
पती लैंगिकदृष्ट्या असक्षम असल्याने देखील सासू आणि सासऱ्याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक (fraud) केली आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार पिडित विवाहितेनं तिच्या आई, वडील व नातेवाईकांना सांगितला.
त्यांनतर फिर्याद दिली. यावरुन याप्रकरणी पती, सासू आणि सास-याच्या विरोधात स्त्री अत्याचार,
विनयभंग, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपींना कडक शिक्षा होण्याची मागणी करण्यात आलीय.
याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | chicken blood given to a married woman by her father in law and raped incident happen in bhosari police station area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gondia Crime | कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वत:लाही संपवलं; जिल्ह्यात प्रंचड खळबळ

Sana Gulwani | 27 वर्षीय हिंदू मुलीने पाकिस्तानात रचला इतिहास; पहिल्याच प्रयत्नात प्रशासकीय सेवा परीक्षा पास

Pune Anti Corruption | पुण्यातील दोन पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ