Pune Crime | मुलांना फायर गेमची डायमंड मेंबरशिपच्या बहाण्याने वडिलांचा पासवर्ड चोरुन सव्वा लाखांना घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलांना फ्री फायर गेमची डायमंड मेंबरशिप (Free Fire Game Diamond Membership) देण्याचा बहाणा करुन सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) त्यांच्या मार्फत वडिलांचा ई पासवर्ड मागून घेऊन आईच्या बँक खात्यातून पैसे काढून घेऊन सव्वा लाख रुपयांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

 

याप्रकरणी शिवणे (Shivane) येथील एका 34 वर्षाच्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९२/२२) दिली आहे. हा प्रकार 1 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 दरम्यान घडला असून त्याचा आता गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांना 12 व 10 वर्षांची दोन मुले आहेत. त्यांच्या पतीचा व्यवसाय आहे. त्यांची मुले फिर्यादीच्या मोबाईलवर फ्रि फायर गेम खेळत असत. त्या ऑनलाईन गेममध्ये काही अनोळखी मुले गेममध्ये सहभागी व्हायची. त्यांच्यासोबत ते मोबाईलवर गेम खेळत असे. त्यातील अंकु नावाच्या मुलाने फिर्यादीच्या मुलांना तुम्हाला फ्रि फायर गेमची डायमंड मेंबरशिप पाहिजे का अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी मेंबरशिप नको असे सांगितले.

त्यानंतरही अंकु हा सातत्याने त्यांना फोन करत होता. मुलांशी गोड बोलून त्याने फिर्यादीच्या पतीचा ई मेल पासवर्ड मागून घेऊन त्यांचे जी मेल अकाऊंट हॅक केले. त्यानंतर तीन दिवसांनी अंकु याने त्यांच्या मुलाला 1600 रुपये पाठवण्यास सांगितले. तेव्हा त्याने गुगल पे करुन मुलांनी पैसे पाठविले. त्यानंतर दोन मोबाईलधारकांनी वारंवार फोन करुन त्यांच्या मुलांकडून ओटीपी मागून फिर्यादी यांच्या खात्यातून फसवणूक (Fraud) पैसे काढून घेत असे. त्यांचा मोबाईल हॅक केला असल्याने त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज त्यांना मिळत नव्हते.

 

एक महिन्यानंतर त्यांच्या पतीला कामाकरीता पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी फिर्यादी
यांचा मोबाईल चेक केला असता त्यांच्या खात्यातून 1 लाख 27 लाख 744 रुपये काढले गेल्याचे आढळून आले.
त्यांनी बँकेत जाऊन स्टेटमेंट मागविले असता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)
सायबर चोरट्यांनी मुलांना हाताशी धरुन ही सायबर चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस निरीक्षक बागवे (Police Inspector Bagway) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Children cheated by stealing father’s password on the pretext of diamond membership of fire game

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uday Samant | आमदार उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या ६ जणांना अटक

 

Hair Fall | गळणार्‍या आणि पातळ केसांमुळे होऊ नका त्रस्त, केवळ खोबरेल तेलात मिसळा या 2 वस्तू

 

Coriander Seeds | धने वापरल्याने उजळेल चेहरा, रोज करून पहा हा उपाय