Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील रास्ता पेठेत महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण; ब्लेडनं कापल्या भुवया, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. पुण्यातील (Pune Crime) एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणासोबत (College Youth) दोघांनी अघोरी कृत्य केलं आहे. आरोपींनी तरुणाला रास्ता पेठेतील (Rasta Peth) महात्मा फुले चौकात (Mahatma Phule Chowk) भेटायला बोलून त्याला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जबरदस्तीने तरुणाच्या भुवया (Cut Eyebrow) ब्लेडने कापल्या. याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे.

समर्थ पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिझवान खलिल Rizwan Khalil (रा. कागदीपुरा, कसबा पेठ Kasba Peth) आणि त्याचा साथिदार साहिल कुरेशी (Sahil Qureshi) असे गुन्हा (FIR) दखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित तरुण पुण्यातील (Pune Crime) एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी तो क्लासला जात होता. त्यावेळी आरोपी खलिल आणि कुरेशी यांनी संबंधित मुलाला फोन केला. तसेच तुझं शिकवणी वर्गात काय भानगड सुर आहे, हे आम्हाला माहीत आहे. तू महात्मा फुले चौकात ये आपण प्रकरण मिटवू असं सांगितलं. त्यानुसार पीडित तरुण रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात आरोपींना भेटण्यासाठी गेला.

त्याठिकाणी आरोपींनी तरुणाला धमकावून त्याला शिवीगाळ केली. तसेच मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर साथीदार कुरेशे याने तरुणाचे हात पकडले तर खलिल याने ब्लेडने (Blade) तरुणाच्या भुवया कापल्या. हा धक्कादायक प्रकार केल्यानंतर आरोपी फरार झाले. मुलासोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Charges filed against four persons for setting shop on fire due to misunderstanding; Incidents in Hadapsar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’