Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! 10 वर्षाच्या मुकबधीर मुलीचा दारु पाजून लैंगिक छळ; दोघांविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घराजवळ खेळत असणाऱ्या 10 वर्षाच्या मुकबधीर (Mukbadhir) मुलीला पळवून (Kidnapping) नेत तिला दारु पाजून (Alcohol) तिचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे. (Crime Against Woman In Pune)

याबाबत एका 32 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यावरुन पोलिसांनी राठोड आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील (Hadapsar) काळेपडळ येथील गणेश कॉलनीत शुक्रवारी (दि.20) रात्री नऊच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 10 वर्षाची मुलगी मुकबधीर आहे. ती घराजवळ असलेल्या कॉलनीत खेळत होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तिला कशाचे तरी आमिष (Lure) दाखवून दुचाकीवरुन जबरदस्तीने पळवून नेले. आरोपींनी मुलीला कंजार भाट वस्तीमध्ये (Kanjar Bhat Vasti) घेऊन गेले. त्याठिकाणी तिला जबरदस्तीने दारु पाजली. रोठोड नावाच्या नराधमाने तिचे कपडे काढून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. तर दुसऱ्याने तिचे केस ओढून तिचा लैंगिक छळ केला.

मुलगी बेपत्ता झाल्याचे रात्री नऊच्या सुमारास लक्षात आले. मुलीच्या आईने आणि नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तेव्हा मुलगी साडेअकरा वाजता सापडली. तिने तिच्याबाबतीत घडलेला प्रकाराची माहिती दिल्यावर मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साठे (PSI Sathe) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Deaf and dumb girl abducted-a-10-year-old-girl-with-alcohol-molestation case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर