Pune Crime | कोरोनामध्ये पती गमाविलेल्या महिलेचा दीराने केला विनयभंग; डेक्कन पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोरोना काळात तिने आपला पती गमाविला. एकाकी झालेल्या महिलेला व तिच्या आई वडिलांना अपमानित करुन सासु सासर्‍यांनी तिच्या स्त्रीधनाचा अपहार केला. तर, दीराने दारु पिऊन येऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. (Pune Crime)

 

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Pune Police) तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुजरातमधील बडोदा येथील मांजलपूरमधील घरी २६ फेब्रुवारी २०२० ते आजपर्यंत घडला.

 

याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५३/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बडोदा येथे असताना कोरोनामध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
त्यांच्या सासु सासर्‍यांनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या आई वडिलांना वेळोवेळी अपमानित करुन शिवीगाळ केली.
फिर्यादी यांना स्त्रीधन म्हणून मिळालेले १८ तोळे दागिने फिर्यादी यांच्याकडून घेऊन त्याचा अपहार केला.
त्यांचा दीर किरण घाटगे (Kiran Ghatge) याने दारु पिऊन येऊन फिर्यादी यांच्याकडे घाणेरड्या नजरेनं पाहून फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल,
असे कृत्य करुन त्यांचा मानसिक व शारीरीक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या छळाला कंटाळून त्या माहेरी निघून आल्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक कवटीवार (Sub-Inspector of Police Kawtiwar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Deera molested a woman who lost her husband in Corona; FIR in Deccan Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Rate Today | तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Shivsena MP Sanjay Raut | ‘मी माझा एकांत सत्कारनी लावला’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Pune PMC News | पीपीपी तत्त्वावर 200 कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध; वाघोली ते लोहगाव रिंगरोड आणि महंमदवाडीतील दोन रस्त्यांचा समावेश