Pune Crime | दारू पिण्याबाबतचा उपदेश पडला महागात ! ताडीवाला रोड परिसरात दोघांनी फोडली एकमेकांच्या डोक्यात बिअरची बाटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Crime | मित्राच्या मुलाला दारु पिऊ नको, असा उपदेश दिल्यावर दुसर्‍याने अगोदर स्वत: दारु न पिता दुसर्‍याला सांगावे, असा उपदेश दिला. उपदेश त्याला चांगलाच महागात पडला. सराईत गुंडाने (Pune Criminals) या गुंडाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. तेथे दारु पित बसलेल्या मुलांनी त्याच्याही डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी विकी ऊर्फ नेप्या काशिनाथ कांबळे (वय २१, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड – Tadiwala Road) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहन ऊर्फ ढंप्या हरी पांढरे (वय ३८, रा. सध्या प्रतिभा रेसिडेन्सी, ससाणेनगर, हडपसर) याला अटक केली आहे. ही घटना ताडीवाला रोड येथील नदी किनार्‍यावरील महादेव मंदिराजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील (Criminals On Pune Police Records) आहेत. फिर्यादी विकी याचे मित्र प्रतिक ऊर्फ बाळ्या कांबळे व गौरव पुजारी हे दोघे नदीकिनारी असलेल्या महादेव मंदिराजवळ बिअर पित बसले होते. यावेळी विकी तेथे गेल्यावर त्यांनी आवाज देऊन त्याला बोलावून घेतले. काही वेळापूर्वी ताडीवाला रोडवर राहणारा मोहन पांढरे हा तेथे आला. तो प्रतिक याला म्हणाला की, तु माझ्या मित्राचा मुलगा आहे. तू कशाला दारु पितोस, असे म्हणल्यानंतर “पहिले आपण दारु न पिता दुसर्‍याला सांगावे.” असे फिर्यादी त्याला म्हणाला. त्यावर पांढरे याने “तू कोण मला विचारणारा. तू काय ताडीवाला रोडमधील मोठा भाई आहेस.
आज तुला जिवंत सोडणार नाही. आज तुझा कार्यक्रमच करतो”, असे म्हणून तेथील रिकामी बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्याने धक्का देऊन खाली पाडले. तेथील दगड उचलून फिर्यादीच्या उजव्या पायावर जोरात मारुन जखमी केले. फिर्यादी यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून तेथे लोक जमा होऊ लागले. लोकांनी फिर्यादीला ससून रुग्णालयात दाखल केले. मोहन पांढरे याला पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

याविरोधात मोहन पांढरे (वय ३८, रा. प्रतिभा रेसिडेन्सी, ससाणेनगर, हडपसर – Sasane Nagar, Hadapsar) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ११९/२२) दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मोहन पांढरे हे पूर्वी ताडीवाला रोड येथे रहात होते. त्यांचे समर्थ स्रॅक सेंटर आहे. ते रविवारी सायंकाळी जुन्या घरी आले होते. त्यानंतर मित्राबरोबर बिअर पिण्यासाठी ते नदीकिनारी गेले. तेथे अगोदरच बाळ्या इस्तरीवाला, गौरव पुजारी व नपी हे दारु पित बसले होते. ती मुले लहान असल्याने त्यांनी तुम्ही लहान आहात कशाला लहान वयात दारु पिता, असे सांगितले. फिर्यादीच्या सांगण्याचा बाळ्या इस्तरीवाल्यास राग आला. त्यांच्यात शिवीगाळ सुरु झाली. बाळ्या याने फिर्यादी याला धक्का देऊन पाडले. बाळ्या याने मागून येऊन फिर्यादी याच्या डोक्यात मागच्या बाजूला बिअरची बाटली फोडली. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याचे पाहून गौरव व बाळ्या पळून गेले. नप्या तेथे आला. त्याने शिवीगाळ करुन आमच्या नादी लागला तर खल्लास करुन टाकीन, अशी धमकी दिली.
त्यामुळे फिर्यादीला राग आल्याने त्याने नप्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. दोघाही जखमींना नागरिकांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title : Pune Crime | Expensive advice on drinking alcohol! In the Tadiwala Road area, the two smashed a bottle of beer into each other’s heads

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त