Pune Crime | ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे कोंढवा पोलिसांना आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बिनव्याजी कर्ज (Interest Free Loan) देण्याच्या बहाण्याने 67 वर्षीय महिलेची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन. ओंडरे (First Class Magistrate C. N. Ondre) यांनी कोंढवा पोलिसांना (Kondhwa Police Station) दिला. त्यानुसार, विजय नामदेव जमदाडे (Vijay Namdev Jamdade) याच्यासह कल्याण सहकारी बँकेच्या (Kalyan Cooperative Bank) अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी, फिर्यादी महिलेने अ‍ॅड. अभिजित सोलनकर (Adv. Abhijit Solankar) यांमार्फत न्यायालयात धाव घेत खाजगी तक्रार दाखल केली. बिनव्याजी कर्ज देण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर, फिर्यादी व त्यांच्या मुलीशी विविध कागदपत्रांवर सही घेतली. मात्र, कर्ज देण्यास वारंवार टाळाटाळ केली. (Pune Crime)

 

यादरम्यान, फिर्यादी यांनी त्यांचा भाऊ व एक विकसकाला (Developer) विकलेली जमीन त्यांची असल्याचे दाखवून फिर्यादी
व त्यांच्या मुलीची बनावट सही व बनावट व्यक्ती उभी करून त्यांच्या जागेच्या खरेदीच्या दस्ताची नोंदणी केली.
याखेरीज, आरोपींनी फिर्यादी यांनी 37 लाख रुपयाचे कर्ज घेतल्याचे दाखविले.
कर्ज परतफेड न केल्याप्रकरणी बँकेने जागा जप्त केली असल्याने आरोपींनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने कोंढवा पोलिसांना दिल्याची माहिती अ‍ॅड.अभिजित सोलनकर यांनी दिली.

 

Web Title :- Pune Crime | File a case against those who cheated an elderly woman, the court orders the Kondhwa police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Jalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

Eknath Shinde Group | शिंदे गटाचे हे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता