Pune Crime | Tata, LG कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, 5 जणांवर FIR

पुणे / रांजणगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरातील नामांकित कंपनीत (Tata, LG) नोकरी (job) देण्याचे आमिष (lure) दाखवून पाच तरुणांची फसवणूक (fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.20) रात्री साडे आठ ते साडे दहा या दरम्यान रांजणगाव एमआयडीसीमध्ये घडला आहे.

 

किशोर पोपट शिंदे (रा. म्हसेखुर्द ता. पारनेर जि अहमदनगर), सुरेश बाप्पू वाळके (रा. बाभुळसर खुर्द ता. शिरूर जि. पुणे),
महादेव जगन्नाथ डुकळे (रा. कोरेगाव ता. शिरूर जि. पुणे), गणेश धुमाळ (रा. औरंगाबाद) व तेजस सुतार (रा. सोलापूर)
अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी संदीप विठ्ठल पवार (वय- 23, रा. खरशिंदे ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांनी आज (सोमवार)
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका मोबाईल नंबरवरून भरतीची सुवर्णसंधी, LG व TATA नामांकित
कंपनीमध्ये जादा पगारावर नोकरी लावतो अशी खोटी जाहिरात दिली होती.
फिर्यादी यांनी जाहिरातींमध्ये असलेला मोबाईल क्रमांकावर संपर्क केला.
आरोपींनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना बोलावून घेतले

फिर्यादी यांनी त्यांच्यासोबत गावातील मित्र समर्थ भाऊसाहेब मैड, लक्ष्मण बाळासाहेब पंडित, सुयोग बाळासाहेब पंडित,
महेश भाऊसाहेब पंडित यांना घेऊन राणजगाव एमआयडीसी येथे आले.
आरोपींनी जादा पगाराची नोकरीचे आमिष दाखवून फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडून कागदपत्रासाठी (documentation)
प्रत्येकी 1700 असे एकूण 8 हजार 500 रुपये घतले.
पैसे घेऊन नोकरी लावली नसल्याने फिर्यादी यांनी आरोपींकडे याबाबत विचारणा केली.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.
तसेच मारण्याची धमकी (Threat) दिली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद शिंदे (PSI Vinod Shinde) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | FIR against 5 persons for cheating youths by offering them jobs in Tata, LG

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ashish Shelar | भाजपामध्ये देखील अंतर्गत वाद? आशिष शेलार अवघ्या 5 मिनिटांमध्ये स्टेजवरून निघाले

Supreme Court | देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यातील वादावर ‘SC’ ने व्यक्त केली चिंता

Nawab Malik In Dubai | वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक अचानकपणे दुबई दौऱ्यावर का गेले?