Pune Crime | सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे परिसरातील अवैध धंद्यावर मोठी कारवाई, अनेकांचे धाबे दणाणले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रशिक्षणार्थी आयपीएस तेगबीरसिंह सिंधु (IPS Tegbir Singh Sindhu) यांनी हवेली पोलीस ठाण्याचा (Haveli Police Station) पदभार स्विकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात मोहिम सुरु केली आहे. एकाच वेळी खडकवासला (Khadakwasla), गोऱ्हे बुद्रुक (Gorhe Budruk), डोणजे (Donje) येथील जवळपास पाच अवैध धंद्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्यसाठा, गुटखा तसेच एक वाहन जप्त केले (Pune Crime) आहे.

 

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक आणि डोणजे येथे अवैध धंदे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आयपीएस संधू यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मद्यसाठा (Alcohol), गुटखा (Gutkha) आणि एक बोलेरो (Bolero) गाडी जप्त केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

ही कारवाई हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी आयपीएस तेगबीरसिंह सिंधु, पोलीस हवालदार रामदास बाबर, पोलीस नाईक किरण कुसाळकर, पोलीस कर्मचारी मकसूद सय्यद व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही ठिकणी अवैध धंदे सुरु असतील तर याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांना (Pune Rural Police) कळवण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Haveli police raid on illegal tenders on sinhagad road khadakwasla donje gorhe budruk in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Symptoms Of Depression In Women | महिलांमधील ‘हे’ आहेत डिप्रेशनची लक्षणे; जराही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

 

Teeth Whitening | पिवळेपणा दूर करुन दात चमकदार आणि मजबूत करण्यासाठी ‘या’ आहेत 5 गोष्टी; जाणून घ्या

 

Pune Crime | स्क्रॅप व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत मागितली दीड कोटीची खंडणी, पुण्यातील कोंढवा येथील प्रकार