Pune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी निलंबित; यापूर्वी त्याच प्रकरणात झाली होती अधिकाऱ्यावर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | विमानतळ पोलीस ठाण्यातील (Pune Police) लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाला अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांनी निलंबित केले आहे.

मारुती बाबुराव वाघमारे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. तपासात तसेच जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेण्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विमानतळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील (API Rahul Patil) व खासगी व्यक्ती संतोष खांदवे (Santosh Khandve) यांना अटक केली होती. या प्रकरणात आणखी एक पोलीस शिपाई मारुती बाबुराव वाघमारे (Maruti Baburao Waghmare) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा (Pune Anti Corruption) अहवाल शहर पोलीस दलाला मिळाल्यानंतर अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी विमानतळ पोलीस ठाण्यातील (Viman Nagar Police Station) मारुती वाघमारे याला निलंबित केले आहे.

Web Titel :- Pune Police | Pune policeman suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; पीडितेने उचलले ‘हे’ पाऊल

Nagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार 

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी; बळकाविला फ्लॅट, जाणून घ्या प्रकरण