Pune Crime | खडकवासला कालव्यात बुडालेल्या 13 वर्षाच्या मुलाची बॉडी हडपसरच्या कॅनॉलमध्ये आढळल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दोन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी खडकवासला कालव्यात (Khadakwasla Canal) गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने एक 13 वर्षाचा मुलगा बुडाला (Drowned) होता. मयुर बापु मरगळे Mayur Bapu Margale (वय-13 रा. शिवनगर, किरकटवाडी) असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे. मयुर याचा मृतदेह आज शिंदेवस्ती, हडपसर (Hadapsar) येथ कालव्यात आढळून आला. मयूर याच्या जाण्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त (Pune Crime) होत आहे.

 

पाच वर्षापूर्वी मयूरच्या वडिलांचे अपघाती निधन (Accidental Death) झाले होते. त्यावेळी तो आठ वर्षांचा होता. कोवळ्या वयात परिस्थितीने अंगात समजूदारपणा आलेल्या मयुने वडीलांच्या नंतर आई आणि आजोबंना मदत व्हावी यासाठी सकाळी लवकर उठून पेपर टाकण्याचे काम सुरु केले. तसेच आजोबांच्या पिठाच्या गिरणीवरही तो मदत करत होता. काम करुन तो त्याचे शिक्षण घेत होता. इयत्ता आठवीत शिकणारा मयुर अभ्यासात हुशार, नम्र आणि मनमिळावू होता. (Pune Crime)

 

सोमवारी (दि.13) तो पोहण्यासाठी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला सुमारे पाचशे मीटर अंतरावर कालव्यात उतरला.
सोबत त्याचा लहान भाऊ व आणखी एक मित्र होता. पोहता येत नसल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणात मयुर दिसेनासा झाला.
घाबरलेल्या मित्राने मयूर च्या आजोबांना याची माहिती दिली. आजोबांनी हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) याबाबत माहिती दिली.
दोन दिवस अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान व हवेली पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो सापडला नाही.
अखेर आज हडपसर जवळील शिंदेवस्ती येथे मयुरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

 

Web Title :- Pune Crime | khadakwasla canal drowning hadapsar 13 years old boy dead body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best Stocks | घसरणार्‍या बाजारात आता खरेदी करू शकता ‘हे’ 5 शेअर, लखपतीला करोडपती बनवण्याची ताकद !

 

Maha Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिस नवाब मलिकांचा जबाब नोंदवणार, न्यायालयाची परवानगी

 

MPSC Exam | MPSC चा मोठा निर्णय ! आता वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार