Pune Crime | दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) व पुणे जिल्ह्यातून (Pune District) तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या (Tadipar) आदेशाचे उल्लंघन करुन लोणी काळभोर परिसरात वावरणाऱ्या सौरभ गोविंद इंगळे (Saurabh Govind Ingle) याला लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. परिमंडळ 5 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी 25 ऑगस्ट 2021 रोजी तडीपारीचे (Pune Crime) आदेश दिले होते.

 

सौरभ गोविंद इंगळे (वय-22 रा.इराणी गल्ली, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची परिसरात दहशत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना दिला होता. यानंतर सौरभ इंगळे याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. (Pune Crime)

 

तडीपार असताना सौरभ इंगळे याने कोणतीही पुर्व परवानगी न घेता पुणे शहरात आला. तडीपार आदेशाचा भंग करुन तो बाजार मैदानात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) कलम 142 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale),
पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore), पोलीस अंमलदार होले, दराडे, फणसे यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Lonikalbhor Police Arrest Pune Criminal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…