पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मानलेल्या मामानेच (Uncle) 13 वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) कोथरुड परिसरात (Kothrud Area) उघडकीस आला आहे. याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2021 मध्ये घडला असून बुधवारी (दि.23) उघडकीस आला आहे.
याबाबत कोथरुड परिसरात राहणाऱ्या 34 वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अप्पर इंदिरानगर (Upper Indiranagar) येथे राहणाऱ्या आरोपी विरुद्ध 376, 376 (फ), 506 सह पॉक्सो कलम (Pocso Act) 4, 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिला सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस (API Aarti Khetmalis) यांनी सांगितले की, आरोपी हा फिर्यादी महिलेचा मानलेला भाऊ (Brother) आहे. त्यामुळे त्याचे फिर्यादी यांच्या घरी येणे जाणे होते. मे 2021 मध्ये फिर्यादी व त्यांचे पती सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरामध्ये आरोपी आणि फिर्यादी यांची 13 महिन्यांची मुलगी घरामध्ये होते. मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीने मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. तसेच व्हिडीओ (Video) काढला. याबाबत कोणाकडे वाच्यता केली तर आई-वडिलांना मारुन टाकण्याची धमकी (Threats to Kill) मुलीला दिली.
आरोपीच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत आई-वडिलांना याबाबत काहीच सांगितले नाही.
मात्र, मंगळवारी मुलगी झोपेतून दचकून उठली. तिच्या वडिलांनी तिला विचारले असता, तिने तिच्याबाबतीत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितले.
मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पीडित मुलीच्या आईने बुधवारी कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दिली.
आरोपीला अद्याप अटक (Arrest) केली नसून आरोपीचा शोध घेत असल्याचे तपास अधिकारी (Investigating Officer) महिला सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस यांनी सांगितले.
Web Title :- Pune Crime | Minor Girl Sexual Harassment Case Kothrud Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update