Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; तरुणावर FIR, येरवडा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकीवरून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या 18 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) मे 2022 ते 3 डिसेंबर 2022 या कालावधीत येरवडा परिसरात घडला आहे.

 

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय 40) येरवडा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिकेत थोरात (वय 18, रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 452, पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या घराच्या खाली दुचाकीवरून चकरा मारून त्यांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. आरोपीने वारंवार मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. दरम्यान शनिवारी (दि.3) मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपी किचनच्या मोकळ्या जागेतून घरात शिरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | molestation of a minor girl; FIR on youth, incident in Yerawada area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार