Pune Crime | रिक्षामध्ये पॅसेजर भरण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; मुंढवा-केशवनगर येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरुन दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला असून त्यात एका रिक्षाचालकाने दुसर्‍या रिक्षाचालकाला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबर जखमी केल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर (Mundhwa-Keshav Nagar) येथील संभाजी चौकात रविवारी दुपारी बारा वाजता घडली.

याप्रकरणी राहुल अंबादास जाधव (वय ३०, रा. मांजरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश कैलास आडसुळे (वय २०, रा. कोळवडी, ता. हवेली) या रिक्षाचालकाला अटक (Pune Crime) केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जाधव व आकाश आडसुळे हे दोघे रिक्षाचालक आहेत. ते रविवारी दुपारी १२ वाजता केशवनगर येथील संभाजी चौकात प्रवाशांची वाट पहात होते. यावेळी त्यांच्यात प्रवासी घेण्यावरुन वाद झाला. तेव्हा आडसुळे याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या गुडघ्यावर, डोक्याच्या मागच्या बाजूला, हातावर, पायावर, मांडीवर व पाठीवर जोरात मारले. या मारहाणीत त्यांच्या उजव्या पायाचे  नडगीचे हाड मोडून ते जबर जखमी झाले आहेत.

 

Web Title : Pune Crime | Mundhwa Keshav Nagar Crime News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thergaon Queen | पोलीस ठाण्यातून बाहेर येताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा, व्हिडीओ व्हायरल

Pune Crime | खळबळजनक! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हाताचा भाग

Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! Work From Home बाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Weekly Salary In India | आश्चर्यम ! आता भारतात ‘ही’ कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना दर आठवड्याला देईल सॅलरी, जाणून घ्या सविस्तर