Advt.

Pune Crime | चाकण बस स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे अर्भक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Crime | चाकण बस स्थानकाजवळ (Chakan Bus Stand) असलेल्या एका इलेक्ट्रीक दुकानाशेजारी झाडाजवळ नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक (New Born Baby) सोमवारी सकाळी आढळून आले. दरम्यान रिक्षाचालक सुजित अजित काळे (रा अंगारमळा, आंबेठाण, ता खेड ) हे अर्भक चाकण पोलीस स्टेशनला (Chakan Police Station) आणले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून त्या अर्भकाच्या नातेवाईकांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण बस स्थानकाजवळ असणाऱ्या रोडवर सोमवारी सकाळी ७ वाजता सुजित व त्याचा मित्र विनोद भगवान हजारे हे दोघे रिक्षाजवळ थांबले होते. त्यावेळी त्यांना एका इलेक्ट्रीक दुकानाशेजारी एका झाडाजवळ नागरिकांची गर्दी दिसली. त्यावेळी, तेथे गेल्यानंतर या दोघांना एका गोनपाटामध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक रडत असल्याचे आढळून आले. सुजित आणि त्याच्या मित्राने अर्भकास रिक्षामध्ये घालून थेट चाकण पोलीस स्टेशनला आणले. हे अर्भक कोणी तेथे ठेवले कोणाचे आहे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. ज्ञात महिलेने तिचे अनैतिक संबंधातुन नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक लोकांपासून माहिती लपवुन ठेवण्याचे उद्देशाने मोकळ्या जागेत सोडून दिले असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला असून अज्ञात महिले विरुद्ध चाकण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

 

Web Title :- Pune Crime | new born baby found near chakan st station police search babys relatives pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aamna Sharif | बिकिनी मध्ये आमना शरीफचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

Nawab Malik | ‘पुरावा दिला तर…’ ! नवाब मलिकांनी शेअर केला क्रांती रेडकरच्या चॅटचा स्क्रीनशॉट

Pune Crime | पुण्यात जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून, परिसरात खळबळ

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या

E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन

Pune Crime | वाळु व्यावसायिक संतोष जगताप खुन प्रकरण ! महादेव आदलिंगे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Pune Crime | घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून

Universal Pension System | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम, मोदी सरकार करतंय विचार, जाणून घ्या